मसुरे | झुंजार पेडणेकर :
पाडावरची दिवाळी २०२६ या कार्यक्रम अंतर्गत मुख्यमंत्री श्री.देवेन्द्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर वंचित बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात येत आहे. देवगड मंडल भाजपाच्या वतीने खासदार श्री.नारायणराव राणे,पालकमंत्री श्री.नितेशजी राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत,माजी आमदार श्री.अजितराव गोगटे यांचे मार्गदर्शनाखाली दिवाळीच्या निमित्ताने मुणगे येथील कातकरी वस्तीवर जाऊन वंचित बंधू भगिनींसोबत दिवाळी साजरी करण्यात आली . यावेळी पाड्यावर दिव्यांची रोषणाई करून दिवाळी फराळाचे वाटप केले. या प्रसंगी जि. प. सदस्य श्री.सुनील पारकर , तालुका अध्यक्ष राजा भुजबळ, तालुका उपाध्यक्ष श्री. गोविंद सावंत,भाजपा सरचिटणीस श्री.महेश जंगले, शिवदास रासम , बाप्पा निकम, सुनिल निकम उपस्थित होते.













