नाखरे येथे मानसिक तणावात असलेल्या तरुणीचा विहिरीत पडून मृत्‍यू

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील नाखरे येथे मानसिक तणावात असलेल्या तरुणीचा विहिरीत पडून मृत्‍यू झाल्याची घटना सोमवार 9नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वा.सुमारास निदर्शनास आली.
प्रियांका लक्ष्मण आडविलकर (33,रा.नाखरे बोरभाटलेवाडी,रत्‍नागिरी) असे विहिरीत बूडून मृत्‍यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिचे वडिल लक्ष्मण महादेव आडविलकर यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्‍यानुसार, त्‍यांची मुलगी प्रियांका ही गेले 16 वर्षांपासून मानसिक तणावाखाली होती. सोमवार 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.15 ते 9 वा.सुमारास ती मानसिक तणावात विहीरीच्या दिशेने गेली असताना विहिरीत पडली होती.तिला विहिरीतून बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र पावस येथे दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.