रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील परटवणे येथील घरात प्रौढाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामदास मोहन पाटील (43,रा.परटवणे सरोदेवाडी,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत अमर राजेंद्र पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, अमर पाटील हे राहते घरी असताना त्यांना अमर अनंत शिवगण यांनी फोन करुन,तुमच्या घराचा दरवाजा बंद असून घरातून काहीतरी कुजल्यासारखा वास येत असल्याचे सांगितले. त्यामुळे अमर पाटील यांनी त्या घरात राहणारे त्यांचे चुलत भाउ रामदास पाटील यांना फोन केला असता तो बंद लागला. म्हणून खबर देणार यांनी परटवणे येथे येउन रामदासला हाक मारली परंतू त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. म्हणून त्यांनी घराचा दरवाजा उघडून पाहिला असता त्यांना रामदासचा मृतदेह बेडरुममध्ये उताण्या व कुजलेल्या स्थितीत दिसून आला. अमर पाटील यांनी तातडीने शहर पोलिसांना याची माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.













