आचरा-अर्जुन बापर्डेकर
ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा मिळाव्यात या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्र आचराची गरज ओळखून आचरे गावची सुकन्या आणि कल्पना प्रतिष्ठान काळाचौकी मुंबईच्या अध्यक्षा अनुराधा अजित मयेकर यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र आचराला शनिवारी सकाळी व्हिलचेअर प्रदान करण्यात यावेळी जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी, प्राथमिक आरोग्य केंद्र आचराच्या वैद्यकीय अधिकारी डॉ जुवेरीया मुजावर,फार्मासिस्ट राखी केसरकर, स्टाफ नर्स आकांक्षा तारकर,,निलेश रेवडेकर,भावना राठूळ एनसीडी स्टाफ नर्स,डाटा ऑपरेटर सोनाली आपकर यांसह अन्य आदी उपस्थित होते. सहकार्या बद्दल डॉ.मुजावर यांनी कल्पना प्रतिष्ठानचे आभार मानले.











