श्री भगवती हायस्कूल, मुणगेचे क्रीडा स्पर्धेत दमदार यश!

▪️कुस्ती, मैदानी स्पर्धा आणि कॅरममध्ये विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

▪️जिल्हास्तर  तसेच विभागस्तरावर  निवड

मसुरे | झुंजार पेडणेकर
देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुलच्या विध्यार्थ्यानी शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती, मैदानी स्पर्धा आणि कॅरम या विविध क्रीडाप्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात वृषभ योगेश धुवाळी याने ४८ किलो वजनी गटात  तालुका तसेच जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत तो विभाग स्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. रिदिमा गोविंद घाडी हिने ५९ किलो वजनी गटात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकवला. श्लोक हेमंत धुवाळी याने ३८ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, तर आर्या सचिन कांबळे हिने ४६ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला.
१७ वर्षांखालील वयोगटात मेघेश आनंद वळंजू याने ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. जय रवींद्र सावंत याने ४८ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक, जनार्दन लक्ष्मण पटकारे याने ४५ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक, तर जय पुरुषोत्तम सावंत याने ७१ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवला. तर  मैदानी स्पर्धेमध्ये
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रांजल ऋषीकेश कामतेकर हिने उंच उडीत तालुकास्तर व जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.व विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्या वर्षी तिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविण्याची कामगिरी केली. तिने हर्डल्स प्रकारात तृतीय क्रमांकही पटकावला.तसेच
लिशा दयानंद तेली हिने लांब उडीत तालुकास्तरावर प्रथम येत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकवला व विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. सलग तिसऱ्या वर्षी विभागाला पात्र होण्याचा बहुमान मिळवला. तसेच २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील मुलींच्या ३ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत श्रावणी कृष्णा रुपये हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात संदेश सुधाकर माळकर याने भालाफेक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर सहभाग घेतला . हर्ष सदाशिव मयेकर याने ५ किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम, तर जय रवींद्र सावंत याने द्वितीय क्रमांक मिळवला व जिल्हास्तरीय साठी पात्र ठरले
तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्यन राणे याने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात किमया कृष्णा मुणगेकर हिने पाचवा क्रमांक, तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात शामिका सचिन घाडी हिने पाचवा क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांनीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
विद्यार्थ्यांनी विविध क्रीडाप्रकारांत मिळवलेले यश हे त्यांच्या नियमित सरावाचे, जिद्दीचे, चिकाटीचे फलित आहे. या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेला नवी झळाळी प्राप्त झाली आहे.
सहभागी विद्यार्थ्यांना प्रशाळेचे सहाय्यक शिक्षक हरिदास महाले व प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शन लाभले तर रश्मी कुमठेकर, गौरी तवटे, सुविधा बोरकर, मनोज मुणगेकर, नामदेव बागवे, स्वप्नील कांदळगावकर यांचे सहकार्य लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका मोनिका कुंज आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.