सुकळवाडमध्ये फुलले दातृत्वाचे नाते!

▪️एसटी स्टँडवर साकारली “माणुसकीची भिंत”

▪️मुख्यमंत्री पंचायतराज अभियान समिती व ग्रामपंचायत संयुक्त उपक्रम

. मसुरे | झुंजार पेडणेकर : आपल्या देशामध्ये दान या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये उदात्त भावना आहे आणि याच भावनेतुन एक सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री पंचायतराज अभियान समिती सदस्य व ग्रामपंचायत यांच्या संकल्पनेतून सुकळवाड येथे साकार झालेली संकल्पना म्हणजे “माणुसकीची भिंत”.

आपल्या स्वतःकडे ज्या अनावश्यक वस्तू आहेत यामध्ये कपडे, चपला, खेळणी अशा वस्तू माणुसकीच्या भिंतीकडे आणून देणे आणि यामधून कोणाची तरी गरज भागविणे या एका सामाजिक जाणीवेतुन” माणुसकीची भिंत ” हि संकल्पना सुकळवाड एसटी स्टँड येथे साकारण्यात आली. “तुमच्याकडे जे अधिक आहे ते येथे द्या, ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना येथून नेऊ द्या.” अशी संकल्पना या मागे आहे. यावेळी प्रभारी सरपंच श्री.किशोर पेडणेकर, माजी पंचायत समिती सभापती श्री.अजिंक्य पाताडे, माजी पंचायत समिती उपसभापती श्री.प्रसाद मोरजकर, माजी सरपंच व समिती सदस्य श्री.प्रकाश पावसकर, माजी उपसरपंच व समिती सदस्य श्री स्वप्नील गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. सागर कुशे, समिती सदस्य श्री.हेमंतकुमार पाताडे,समिती सदस्य श्री. अनिल काळसेकर ग्रामपंचायत कर्मचारी श्री.अक्षय पाताडे, केंद्रचालक रूपाली बिलये ग्रामपंचायत सफाई कर्मचारी श्री.सुभाष म्हसकर,रिक्षा युनियन अध्यक्ष श्री. सुनिल आयरे,ग्रामस्थ श्री.संतोष महाडेश्वर, श्री.राकेश वराडकर, श्री.अमोल राऊळ, श्री.राजन पेडणेकर, श्री.अजय मयेकर, श्री.संतोष सावंत, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम.वेदिका गोसावी व अन्य सुकळवाड ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. सुकळवाड ग्रामपंचायत च्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.