आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे वनराई चे काम कौतुकास्पद-सरपंच जेरॉन फर्नांडिस

आधुनिक शेतीच्या प्रसारासाठी वनराई तर्फे आचरा येथे पुढाकार

आचरा सरपंच फर्नांडिस यांनी पहाणी करत व्यक्त केले समाधान

आचरा-अर्जुन बापर्डेकर

शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन पीक उत्पादन व उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने ते तंत्रज्ञान शेतापर्यंत पोहोचविण्याचे वनराई संस्था व एचडीएफसी बँक यांच्या सहकार्याने सुरू असलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

वनराई संस्था व एचडीएफशी बँक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत वरचीवाडी येथे शेतकरी धर्माजी कदम यांच्या शेतात कलिंगड पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करण्याचे काम सुरू झाले आहे.धर्माजी कदम यांच्या शेतावर हा प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करण्यात येत असून, या उपक्रमात धर्माजी भगवान कदम, सचिन धर्माजी कदम, हरिश्चंद्र भगवान कदम आणि शिवम सचिन कदम हे शेतकरी सहभागी झाले आहेत.

आहे.याची पहाणी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांनी करून आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.यावेळी त्यांच्या सोबत व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,वनराई संस्थेचे फील्ड कोऑर्डिनेटर शिवराम म्हापणकर , गौरी मायनाक ,व्हिलेज रिसोर्स पर्सन (VRP) प्रथमेश आचरेकर उपस्थित होते. त्यांनी प्रात्यक्षिक प्लॉटचा उद्देश, पीक व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापराविषयी माहिती दिली.

या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही सुधारित शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच पीक व्यवस्थापनात सुधारणा, उत्पादनवाढ आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यास या उपक्रमाची निश्चितच मदत होणार असल्याचे यावेळी म्हापणकर यांनी सांगितले.