आचरा-अर्जुन बापर्डेकर
शालेय शिक्षण विभागाच्या ‘चला शाळेत जाऊया’ या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत ७आक्टोबर रोजी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते
केंद्र शाळा आचरे नंबर एकचा आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर आणि सदस्यांचा सन्मान होणार असल्याने सर्वाचे अभिनंदन केले जात आहे.
*शिक्षण विभाग (प्रा.), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता DPDC हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस* येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून आदर्श काम करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्यांची (SMC) निवड करून त्यांचे सादरीकरण ठेवण्यात येणार आहे. यामध्ये *मालवण तालुक्यातील कै. बा. ना. विडये विद्यालय, केंद्रशाळा आचरा नं. १* शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर यांची निवड झाली आहे.
याबाबत शिक्षण विभागाकडून प्राप्त पत्रानुसार
आचरा केंद्रशाळा नं. १ ने SMC च्या सहकार्यातून उल्लेखनीय प्रगती केली आहे. SMC च्या अथक प्रयत्नाने शाळेची पटसंख्या ८० वरून १०१ पर्यंत वाढवण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांमधून पालकांना आणि समाजाला शाळेपर्यंत आणण्यात यश आले.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, ‘निपुण महाराष्ट्र’, ‘विज्ञान समृद्धी कार्यक्रम’, वारकरी दिंडी, माता पालक मेळावा, गावातील दिंडी जत्रा यासारखे उपक्रम राबवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवली.
शाळेसाठी Wi-Fi सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शालेय परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी SMC मार्फत दरमहा *रु. २५००/- मानधनावर सफाई कामगाराची नेमणूक* करण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांची इतर शाळांमध्ये शैक्षणिक भेटीसाठी निवड झाली असून, शाळेने सर्वांगीण विकासाचे मॉडेल घालून दिले आहे. यामुळे प्रेरित होऊन ही निवड करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून प्राप्त पत्रानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत जयप्रकाश परूळेकर, तसेच सर्व सदस्य,शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.













