शृंगारतळी जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावात काही विकासकाम करणार जि. प. सदस्य प्रमोद गांधी

गुहागर प्रतिनिधी :
Bbगुहागर तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपूर्वी दोन रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले आहे यापुढे देखील प्रत्येक गावामध्ये विकासकामे झालेली पुढील काळात दिसतील असा ठाम विश्वास मनसेचे गुहागर व चिपळूण तालुका संपर्क अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी व्यक्त केला. शृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयामध्ये राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की,गुहागर समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकनाचा दर्जा मिळाल्याने गुहागर वासियांसाठी आनंदाचा क्षण आहे, आता यापुढे गुहागर वासियांचे कर्तव्य आहे की, आपला समुद्रकिनारा कशा रीतीने स्वच्छ व सुंदर ठेवता येईल, त्याला मिळालेल्या ब्लू फ्लॅग दर्जाचे पावित्र्य कसे राखता येईल, आलेल्या पर्यटकांचे कसे सन्मान राखता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, हा सन्मान कायमस्वरूपी कसा टिकेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, गुहागर तालुक्याला मिळालेला मानाचा तुरा अखंडपणे ठेवूया, यासाठी सर्वांची सहकार्याची गरज आहे. गुहागर तालुका दुष्काळग्रस्त झाला नाही यांची खंत असून कशाप्रकारे प्रशासनाने माहिती गोळा केली हे माहित नाही, जिल्ह्यातील तीन तालुके अद्यापही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले नाहीत, गुहागर तालुक्यामध्ये पाण्याचा कधीही दुष्काळ आला नाही, परंतु शेती असेल तसेच आंबा व इतर बागायती याच्यावर फार मोठा परिणाम होईल अशी परिस्थिती आहे, त्यामुळे सरकारने असा पुनर्विचार करून गुहागर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना काही मदत करता येईल यासाठी प्रयत्न करावा, अशी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सरकारला विनंती करत आहोत, आमचे मनसेचे पदाधिकारी प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देऊन त्या त्या गावामध्ये काय दुष्काळाची परिस्थिती आहे याची माहिती घेत आहेत, त्या त्या गावातील दुष्काळाची परिस्थिती जाणून घेऊन त्याचा अहवाल सन्माननीय राज साहेब ठाकरे यांना देणार आहोत, लवकरच राज साहेब ठाकरे यांचा कोकण तसेच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये दुष्काळ परिस्थितीची आढावा घेण्यासाठी दौरा होणार आहे , त्यानुसार ते मार्गदर्शन करणार आहेत, शृंगारतळी जिल्हा परिषद गटांमध्ये पंधरा दिवसापूर्वी प्रमुख दोन रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले होते,अजूनही छोटी मोठी कामे शिल्लक आहेत, इतरही कामांचे लवकरात लवकर टेंडर निघून भूमिपूजनेही होतील, डिसेंबर अखेर काही कामांचे भूमिपूजने होतील, अशी अपेक्षा ठेवूया, कसा विश्वास व्यक्त केला. यावेळी मनसेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर तसेच मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.