प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

कर्जत : इंडियन सोसायटी ऑफ कोस्टल ऍग्रीकल्चरल रिसर्च (आयएससीएआर), कॅनिंग टाऊन, पश्चिम बंगाल; डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली ; केंद्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्थान, कर्नाल; दापोली चाप्टर ऑफ आयएससीएआर आणि इंटरडिसिप्लीनरी सोसायटी फॉर एडवान्समेंट ऑफ एग्रीकल्चर सायन्सेस ऍण्ड टेक्नॉलॉजी, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ नोंव्हेबर ते २२ नोव्हेंबर, २०२६ या कालावधीत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे ” क्लायमेट स्मार्ट, डिजिटल ऍण्ड ग्रीन टेकनॉलॉजिज फॉर ट्रान्सफॉरमिंग कोस्टल ऍण्ड अलाईड ऍग्रो इकॉसिस्टीम्स ” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. संजय भावे, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचे अध्यक्षतेखाली आणि प्रोफेसर अजित जावकर, डायरेक्टर, युनिव्हसिटी ऑफ ऑक्सफर्ड, इग्लंड यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिसंवादाचे दि. १९ नोंव्हेंबर, २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता उद्घाटन होणार आहे. सदर परिसंवादाचे प्रमुख आयोजक डॉ. टी. डी. लामा इंडियन सोसायटी ऑफ कोस्टल एग्रीकल्चरल रिसर्च (आयएससीएआर), कॅनिंग टाऊन, पश्चिम बंगाल असून सोसायटीचे अध्यक्ष डॉ. बुध्देस्वर माजी आणि स्थानिक आयोजक डॉ. संतोष सावर्डेकर यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिसंवादामध्ये देश-विदेशातील २५० शास्त्रज्ञ, ५० विद्यार्थी आणि ५० प्रगतशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या परिसंवादामध्ये विविध विषयांवर शेतीविषयक सांगोपाग चर्चा होणार असून यातून येणाऱ्या निष्कर्षामधून भविष्यातील कृषि क्षेत्रातील संशोधनाची दिशा ठरण्यास मदत होणार आहे, असे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जतचे कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कळविले आहे.