म्हापणचा प्रसिद्ध त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव २३ व २४ रोजी 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण पंचक्रोशीतील श्री देवी शांतादुर्गा-श्री देव सिद्धेश्वराचा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे लोक लांब लांबुन हा उत्सव बघण्यासाठी येतात या दोन दिवसात संपूर्ण गाव दिव्यांच्या रोषणाईने व रांगोळींनी सजवला जातो यंदा २३ व २४ नोव्हेंबर रोजी हा उत्सव साजरा होता आहे २३ रोजी रात्री म्हापणचा त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सवाला सुरूवात श्री देवी शांतादुर्गा-श्री देव सिद्धेश्वराची उत्सव मुर्ती काढुन होते त्यानंतर पालखीमध्ये विराजमान करून पाखली सजवली जाते व पालखी श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिराचा दिशेने प्रस्थान करते यावेळी रस्ताचा दोन्ही बाजूस रांगोळी काढली जाते व बांबु च्या काठ्यांवर शेणाचे गोळे लावले जातात व त्यावर पणत्या लावल्या जातात अनेक देखावे देखील लावले जातात व लोक देव आपल्या घरी आल्यामुळे ओट्या भरतात पालखी विठ्ठल रखुमाई मंदिरात पोहचताच श्रींची मखरात स्थापना करतात रात्रभर जागर होतो सकाळी काल खेळला जातो दुपारी नैवेद्य दाखवला की पालखी विठ्ठल रखुमाई मंदिरातुन श्री देव सिद्धेश्वर मंदिरात जाते तेथे तेथिल पुरोहिताकरवी श्रींचे पुजन होते तथा पालखी सातेरी (शांतादुर्गा)मंदिरात जाते काहीकाळ विश्रांती घेऊन रात्रौ पालखी पुन्हा मंदिरातुन बाहेर काढली जाते यावेळी पालखी श्री देवी शांतादुर्गा(सातेरी) मंदिराचा भोवती ३ प्रदक्षिणा मारते तदनंतर पालखी पुन्हा श्री देव सिद्धेश्वर(महादेव) मंदिरात जाते तेथे ३ प्रदक्षिणा मारते यावेळी दोन्ही वेळी मंदिरांचा गोल पणत्या लावुन शिवशंकरांचा त्रिपुरासुरावरचा विजय त्रिपुरारी पौर्णिमेचा रूपात साजरा करतो तदनंतर पालखी श्री देव सिद्धेश्वर मंदिरातुन बाहेर पडुन ब्राह्मण मंदिरातचा दिशेने जाते यावेळी देखील रस्ताचा दोन्ही बाजुस रांगोळी व पणत्यांची सजावट असते ब्राह्मण मंदिरात पोहोचताच ३ प्रदक्षिणा मारून पालखी पुन्हा श्री देवी शांतादुर्गा मंदिराचा दिशेने प्रस्थान करते सकाळी पालखी मंदिरात पोहचताच श्रींचे पुजन करून उत्सव मुर्ती जामदार खान्यात ठेवून उत्सवाची सांगता होते.