भाजपच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळ प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर

 चिपळूण शहराची जबाबदारी मधुकर निमकरांकडे!

 चिपळूण ग्रामीण प्रभारीपदी स्वप्ना यादव

 जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याकडून नियुक्तीपत्र जारी

चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील विविध मंडळांच्या प्रभारी पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांनी दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये रत्नागिरी शहर प्रभारीपदी सचिन वहाळकर, रत्नागिरी दक्षिण प्रभारीपदी अशोक मयेकर, रत्नागिरी उत्तर प्रभारीपदी दत्ता देसाई, रत्नागिरी मध्य प्रभारीपदी सतीश शेवडे, लांजा-राजापूर प्रभारीपदी अमित केतकर आणि संगमेश्वर प्रभारीपदी प्रमोद अघटराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चिपळूण ग्रामीण प्रभारीपदी सौ. स्वप्ना प्रशांत यादव, तर चिपळूण शहर प्रभारीपदी मधुकर निमकर यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, पक्षाची विचारधारा आणि कार्यपद्धती तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच संघटनात्मक कामकाजाला गती देणे, यासाठी हे नवनियुक्त प्रभारी मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केला आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी अभिनंदन करून पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.