भाजपा मंडणगड तालुका प्रभारीपदी अजय दळवी यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती; जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांचे मार्गदर्शन.

मंडणगड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने भाजपा मंडणगड तालुका प्रभारीपदी प्रदेश पदवीधर प्रकोष्ठाचे श्री. अजय दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष श्री. सतीश मोरे यांनी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्तर रत्नागिरी जिल्ह्सातील मंडणगड खेड दापेली गुहागर व चिपळुण या पाच तालुक्यातील नवीन नियुक्तीचे पत्र घोषित केले आहे.त्यात या निवडीची घोषणा करण्यात आली आहे. मंडणगड नगरपंचायत व तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींचे निवडणुकांचे पार्श्वभुमीवर ही निवड महत्वाची ठरण्याची शक्यता असुन पक्षाने श्री अजय दळवी यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मंडणगड तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. या नियुक्तीबद्दल भाजपा मंडणगडच्या वतीने श्री अजय दळवी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस जिल्हा अध्यक्ष सतिश मोरे तालुका अध्यक्ष दत्ताजी महाडीक यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्त्याकडुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.