वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर
नव्याने तयार होत असणारा मिऱ्या नागपूर या मार्गामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रच जोडला जातोय असं नाही. तर हा मिऱ्या-नागपूर मार्गाने पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भ मराठवाडाही जोडला जाणार आहे. या महामार्गाचा झिरोपॉइंट मिऱ्याला आहे. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र नवीन घाटमार्गातून जवळ येत असताना त्याच अंतर आणि वेळ फारच कमी होणार आहे. घाटमार्गातील वळणामुळे जाणारा वेळ वाचणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या व्यावसायिकतेच्यादृष्टीने भविष्यात फारमोठा फायदा होऊ शकेल.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. कोकण आणि मुंबईच जस एक वेगळ नात आहे तसच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच एक वेगळ व्यावसायिक नात आहे. कोकणातील बाजारपेठांना किराणा वस्तु याच पश्चिम महाराष्ट्रातून येत होत्या. आजही हे व्यावसायिक नात पूर्वी इतकच घट्ट टिकून आहे. कोकणातील कोणीही अनेक गोष्टींसाठी सहजरित्या कोल्हापूरला जातो. कोकणच्या किनारपट्टीवरून मासे पश्चिम महाराष्ट्रात जातात. तर पश्चिम महाराष्ट्रातील दूध, भाजी अस सर्वकाही कोकणात येत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचे आजचे व्यावसायिक संबंध नाहीत तर ते फारपूर्वीपासूनच कोकणातील ग्रामीण भागापर्यंत धान्य, कडधान्य पश्चिम महाराष्ट्रातून येत आहेत. अगदी साठ-सततर वर्षांपूर्वी जेव्हा बैलगाडीतून मालवाहतुक व्हायची तेव्हा कोकणातून बैलगाड्या कोल्हापूरला जायच्या आणि या वस्तू घेऊन येत असत. तेव्हा घाटमाथ्यावरील काही भागात गाड्या अडवून लुटमारीचे प्रकारही व्हायचे. परंतु दुसरा कोणता मार्गही नव्हता आणि वाहतुकीची कोणती साधनही नव्हती. त्यामुळे बैलगाडी हेच मालवाहतुकीचे साधन होते. एकावेळी पाच पंचवीस बैलगाड्या मालवाहतुकीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जायच्या मागील सत्तर-एैंशी वर्षापूर्वीच्या या गोष्टी वयोवृद्धांच्या चर्चेतून एैकायला मिळते. कोकणात येणारा फोंडाघाट, गगनबावडा , करूळ घाट, अणुस्कुराघाट, भुईबावडा घाट, आंबोली घाट, आंबाघाट अशा या घाटमाथ्यावरून येणारे मार्ग आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या बाजारपेठा जवळच्या वाटतात. रायगड जिल्ह्याला मुंबई, ठाणे, पुणे हे अधिक जवळ आहेत. त्यामुळे विशेषकरून रत्नागिरी सिंधुदुर्गात धान्य, कडधान्य, कपडे अशा सर्व वस्तू पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून येतात. कोल्हापूर, सांगली या बाजारपेठांचा व्यापारच कोकणावर अवलंबून आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या घाट रस्त्यांची काम प्रगतीपथावर आहे. रत्नागिरीतील मिऱ्या नागपूर हा महामार्गही आता शेवटच्या टप्यात आहेत. अवघ्या पाचवर्षात मिऱ्या रत्नागिरी-नागपूर रस्त्याचे काम एका ठराविक कालावधीत पूर्ण होत आहे. ही निश्चितच कौतुकाचीच बाब आहे. मिऱ्या नागपूर हा नव्याने निर्माण होणारा मार्ग आंबाघाटातून जाणारा आहे. आंबा घाटामध्ये भुयारी मार्ग करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर आंबाघाटात भुयारी मार्ग करण्यात आला तर रत्नागिरीतून अवघ्या दिड तासात कोल्हापूरला जाता येणारे आहे. अणुस्कुरा घाटाचे कामही सुरू आहे. त्यामुळे अणुस्कुरा घाटात विशेषकरून पावसाळयात वारंवार दरडी कोसळतात. वाहतुक अनेकवेळा बंद पडते. वाहतुक सुरक्षेच्याबाबतीत काहीशा सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्या करण्यात आल्या तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यासह महामार्गालगतच्या अनेक गावांना जोडता येणारा हा घाटमार्ग अधिक जवळचा होणार आहे. आंबोली घाटानेही कोकणात येण्यासाठीचा अधिक चांगला पर्याय झालेला आहे. सिंधुदुर्गात करूळ-गगनबावडा कोल्हापूर घाटरस्ता आणि फोंडाघाट घाटरस्त्याचे काम आता सुरू आहे. जेव्हा गगनबावडा करूळ घाटमार्ग पूर्ण होईल.या रस्त्याचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यावर सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्राच्या अधिक जवळ जाईल. या पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवासासाठी लागणारा वेळ निम्यावर येईल इतक्या कमी वेळात पश्चिम महाराष्ट्रात जाता येईल. कोकणातून व्यापाराच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या कोकणवासियांच्या दृष्टीनेही महत्व अधिक आहे. रत्नागिरी, रायगडमधील मासळी पुणे, पश्चिम महाराष्ट्रात जाते. या चौपदरीकरण होणाऱ्या घाटमार्गामुळे निश्चितच फारच वेळ वाचणार आहे. नव्याने तयार होत असणारा मिऱ्या नागपूर या मार्गामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रच जोडला जातोय असं नाही. तर हा मिऱ्या-नागपूर मार्गाने पश्चिम महाराष्ट्राबरोबरच विदर्भ मराठवाडाही जोडला जाणार आहे. या महामार्गाचा झिरोपॉइंट मिऱ्याला आहे. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र नवीन घाटमार्गातून जवळ येत असताना त्याच अंतर आणि वेळ फारच कमी होणार आहे. घाटमार्गातील वळणामुळे जाणारा वेळ वाचणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या व्यावसायिकतेच्यादृष्टीने भविष्यात फारमोठा फायदा होऊ शकेल.
आपोआपच व्यावसायासाठी अधिक संधी निर्माण होणारी आहे. आंबा, काजू, जांभूळ यालाही बाजारात कमी वेळेत वस्तू पोहचवणे सोप होणार आहे. जेव्हा या सर्व घाटरस्त्यांची काम पूर्ण होतील आणि हे घाटमार्ग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील तेव्हा निश्चितच व्यापार, व्यावसायामध्ये अधिक चांगल होईल त्याचा निश्चितच कोकणाला फायदा होईल यात संदेह नाही.













