राजापूर नगर वाचनालयात ‘रामायणातील ती’ कार्यक्रमातून उलगडले स्त्रियांचे भावविश्व

राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर नगर वाचनालयाच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘रामायणातील ती’ या विशेष कार्यकमात पसिध्द व्याख्यात्या आणि निवेदिका अनघा मोडक यांनी रामायणातील प्रमुख आणि उपेक्षित स्त्री व्यक्तीरेखांचा प्रवास, त्यांचे विचार आणि भावविश्व उलगडले.
राजापूर नगर वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यकमाला कवी प्रमोद जोशी, सृष्टी कुलकर्णी, पल्लवी मोडक, श्रीनिकेत मोडक आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अनघा मोडक यांनी आपल्या अभ्यासपूर्ण, ओघवत्या आणि प्रभावी निवेदन शैलीच्या माध्यमातून रामायणासारख्या महाकाव्यातील विविध स्त्री व्यक्तिरेखा म्हणजा सीता, उर्मिला, कैकयी, शुर्पणखा, मंदोदरी, शबरी यांच्या भावविश्वा आणि भूमिकांचा मागोवा घेतला. रामायणाकडे केवळ रामकथा म्हणून न पाहता त्यातील स्त्रीयांच्या नजरेतून या महाकाव्याचा अर्थ समजून सांगितला.
रामायणातील तीच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, तिची त्यागमय भूमिका, कर्तव्यनिष्ठा, संयम, आत्मसन्मान आणि जीवनमूल्ये यांचा वेध या कार्यक्रमातून घेतला. पारंपरिक कथनापलीकडे जाऊन सीतेच्या व्यक्तिरेखेचा साहित्यिक व भावनिक दृष्टिकोनातून उलगडा करणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरला.
या कार्यकमात निवेदनासोबता भावपूर्ण गाण्यांही समावेश होता. गायिका सृष्टी कुलकर्णी यांनी या कार्यकमात सह-गायिका म्हणून साथ दिली. तर पमोद जोशी यांनी समयोचित काव्य वाचन केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रभात पाध्ये, उपाध्यक्ष जयेश हर्डीकर, कार्यवाह जयंत अभ्यंकर, सहकार्यवाह सुहास ओळकर, सदस्य राजेंद्र रानडे, शैलेश आंबेकर, दर्शना मांडवकर, श्रृती ताम्हनकर आदींसह राजापूर शहरासह परिसरातील साहित्यप्रेमी, वाचनप्रेमी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकमो सुत्रसांलन ग्रंथपाल पद्मजा कारेकर यांनी तर पाहुण्याचा परिचर कार्यवाह जयंत अभ्यंकर यांनी करून दिला तर आभार साईशा पड्यार यांनी मानले. दरम्यान वर्धापन दिनाच्या निमित्ताने सकाळी सुधाकर करंबेळकर यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले.