गौरव पोंक्षे माखजन:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय टेनिक्वाईड (रिंगटेनिस ) स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
१४ वर्षे वयोगटांमध्ये मुली अंतिम सामन्यात विजयी झाल्या. प्रथम क्रंमाक पटकावून विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या संघात तन्वी साळवी, ईश्वरी घाटकर, मीरा हेलेकर, स्वरा जैन, आरोही शिंदे .१७ वर्षे गटातमध्ये अनन्या गिरकर, श्रावणी हळदे, समृद्धी देर्देकर, इशिका आग्रे, रुद्रा शिंदे या विद्यार्थिनींचा समावेश होता . या मुलींनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून त्यांची निवड विभागिय स्पर्धेसाठी झालेली आहे . तर १९ वर्षे वयोगटा मधील मुलींनी जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला या संघामध्ये आदिती जाधव, अनन्या जाधव,गौरी घाडी, जान्हवी कलकुटकी, शर्वरी गमरे यांचा समावेश होता
विजयी संघाला क्रीडा अधिकारी श्री सुनिल कोळी यांनी शुभेच्छा दिल्या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमुख श्री समीर कालेकर सर, माजी विद्यार्थी निखिल वारके व सौ. गायत्री सोळुंके यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय बनसोडे सर उपमुख्याध्यापिका सौ . रेवती कारदगे पर्यवेक्षक श्री खाडे व संदीप मुंढेकर तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ , त्याचबरोबर चिपळूण शहरातील नागरीक व पालकांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.













