संविधान दिनानिमित्त उद्देशिकेच्या प्रतिमा भेट देण्याचा अभिजीत देवळेकर यांचा उपक्रम

मंडणगड (प्रतिनिधी)  : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांच्यावतीने तालुक्यात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिमा भेट देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांची जनजागृती व्हावी, नागरिकांमध्ये संविधानाविषयी आदर निर्माण व्हावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांनी देशास दिलेले संविधान हे प्रत्येक नागरिकाला समान हक्क, न्याय, स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे महान राष्ट्रीय दस्तऐवज आहे.संविधानिक अधिकारांसोबतच नागरिकांनी आपल्या कर्तव्यांचीही जाणीव ठेवणे गरजेचे आहे.
संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणारा देवळेकर यांचा हा उपक्रम संविधानिक मूल्यांच्या जपणुकीच्या दृष्टीने स्तुत्य ठरणारा आहे.