के.ई.एम.हॉस्पिटल, परळ ( मुंबई) येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत ब्लँकेट वाटप

सदिच्छा फाउंडेशनच्या या संस्थेच्या माध्यमातून वेरळ गावचे सुपुत्र सचिन गुंड्ये आणि सहकाऱ्यांचा उपक्रम

संतोष कोत्रे
लांजा: मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातेवाईक जे रात्रंदिवस हॉस्पिटलच्या आवारात राहतात. त्यांचे कडाक्याच्या थंडीपासून रक्षण व्हावे, या उदात्त हेतूने त्यांना मोफत ब्लँकेट वाटप करून
वेरळ गावचे सुपुत्र सचिन गुंड्ये यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने आपली खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे .
लांजा तालुक्यातील वेरळ गावचे सुपुत्र असलेले सचिन गुंडये हे व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने मुंबई येथे राहतात. व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असताना अनेकदा केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील आणि आपल्या गावाकडील आणि विशेषता कोकणातील गोरगरीब जनतेची जेवण खाण्यापासून होणारी हेळसांड त्यांनी पाहिली होती. आणि अशांसाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी सुरुवातीला केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना स्वखर्चाने मोफत टिफिनची पुरवण्याचे काम सुरू केले .मात्र आपला काम धंदा, व्यवसाय सांभाळून या सर्व गोष्टी करणे सहज सोपे नव्हते. म्हणूनच त्यांनी सदिच्छा फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.
गेल्या तीन वर्षांपासून सदिच्छा फाउंडेशनच्या या संस्थेच्या माध्यमातून सचिन गुंड्ये यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील केईएम रुग्णालयात येणाऱ्या कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड,पालघर या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना तीन वर्षांत २४,००० मोफत टिफिन पुरवून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सध्या जोरदार थंडी पडत आहे. अशावेळी के.ई.एम. हॉस्पिटल, परळ येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांचे अनेक नातेवाईक हे रात्रंदिवस हॉस्पिटलच्या आवारात राहतात. कडाक्याच्या थंडीपासून बचाव करताना त्यांची होणारी कसरत लक्षात घेऊन व थंडीपासून त्यांचे रक्षण व्हावे, या उद्देशाने सचिन गुंड्ये यांनी सदिच्छा फाउंडेशनच्या या संस्थेच्या माध्यमातून
या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत ब्लँकेट वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मोफत ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला.
सदिच्छा फाउंडेशनच्या माध्यमातून हा मोफत ब्लॅंकेट वाटप कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन गुंडये व सहकारी उपस्थित होते.या उपक्रमासाठी कांचन भोसले, रुपाली भोसले,स्वप्नश्री शिंदे,रवींद्र वायगंनकर, निखिल निकम, मनीष सावंत ,दिपक गावडे,दिनेश पातेरे,महेश गुंडये ,संतोष गावडे,संदेश गुरव,संजय गुंडये,संजय मोक्षे,मनिषा बंडबे, प्रतिमा पाटील ,संतोष बावकर ,अजित ठोंबरे, सूचक राजेशिर्के, नितीन गोरीवले, संजय खेतल ,संतोष चव्हाण , सचिन गद्रे , भूषण वैद्य ,रोहित पवार,अमेय घाडीगावकर,जनार्दन गावडे,निखिल निकम ,आशिष भोईर, प्रज्योत कर्ले ,शशिकांत शर्मा या सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले आहे.