जगा आणि जगु द्या हा उत्कृष्ट विचार देणारा दिशादर्शक मंत्र आहे संविधान- श्री. गजानन लाड राज्यप्रमुख प्रशासकीय समिती
शंकर वैद्य साखरपा:
भारतीय मानवाधिकार असोसिएशन, दिल्ली या संघटनेच्या राज्य पदाधिकारांकडुन कोर्ट नाका ठाणे येथील आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना श्री. लाड राज्य प्रमुख यानी उपरोक्त विधान केले.
या कार्यक्रम आरंभी श्री गजानन लाड राज्य प्रशासकीय प्रमुख व श्री. गजानन फडकले राज्य प्रमुख आर्थिक संरक्षण समिती यांनी भारतरत्न डॅा. आंबेडकर यांचा पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.
यानंतर श्री. गजानन फडकले राज्यप्रमुख आर्थिक संरक्षण समिती यांनी थोडक्यात संविधान महत्ती सागितली. सर्व धर्मग्रंथ स्वर्ग प्राप्तीचा मार्ग दाखवतात,या उलट संविधान माणुसकीचा संदेश दाखवतो. जणु प्रत्येकाला समतेची वागणुक, आचार विचार स्वातंत्र्य व बंधुभाव देणारी जीवनप्रणालीच,सर्वानी याचा आदर सन्मान करावा हाच या संविेधान दिनाचा उद्देश.
यानंतर संविधान उद्देशिका यांचे वाचन करून आचंद्रसुर्य संविधान कायम रहे या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सदर संघटनेसहित विविध संघटनांचे पदाधिकारी व शेकडो सदस्यगण उपस्थित होते. शेवटी संयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.













