# देवगडमधील ज्येष्ठ व्यापारी संदेश शिरसाट यांना मातृशोक; माई शिरसाट यांचे निधन
**देवगड : प्रतिनिधी**
देवगडमधील ज्येष्ठ व्यापारी संदेश शिरसाट यांच्या मातोश्री श्रीमती माई शिरसाट यांचे आज, शनिवारी पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिरसाट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून देवगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माई शिरसाट या जगताप वाडीतील रहिवासी होत्या. मृत्यू समयी त्यांचे वय 89 वर्ष होते.त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच परिसरातील ग्रामस्थांनी शिरसाट कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. अत्यंत मनमिळावू व अडचणीत सापडलेल्यांना मदत करणाऱ्या अशी त्यांची ख्याती होती
त्यांच्या पश्चात मुलगा संदेश शिरसाट आणि नात असा परिवार आहे.













