विलवडे माऊलीचा आज जत्रौत्सव

ओटवणे (प्रतिनिधी ) श्री देवी माऊली पंचायतन विलवडे श्रीं देवी माऊलीचा जत्रौत्सव आज रविवार २९ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी संपन्न होत आहे. दिवसभर देवीची ओटी भरणे, साकडं घालणे नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पडणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा आणि त्यानंतर मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे या जत्रौत्सवास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान कमिटी तसेच ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.