९३ च्या दंगलीत हिंदुना वाचवलं त्याच मातोश्रीत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे कडून रक्षा बंधन

उद्धव ठाकरे यांचे हेच हिंदुत्व आहे काय ? नितेश राणे यांचा सवाल

राहुल गांधी, सोनिया गांधी यांना स्व.बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करायला लावा मग कळेल

 उबाठा सेनेची चुकून सत्ता आल्यास मुंबई बांगलादेशी, रोहिंग्याचे शहर होईल

कणकवली : ज्या मातोश्री मध्ये बाळासाहेबांनी हिंदूंचा आवाज बुलंद केला ९३ च्या दंगलीत हिंदुना वाचवलं त्याच मातोश्रीत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या ममता बॅनर्जी कडून उद्धव ठाकरे राखी बांधून घेतात हेच उबाठा सेनेचे हिंदुत्व काय ? ज्या पश्चिम बंगाल मध्ये राम नवमी ला बंदी आहे, हिंदूंवर अत्याचार होतात त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मातोश्रीवर जाणे हा हिंदूंचा अपमान असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली. खरचं तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असाल तर राहुल गांधी, सोनिया गांधी यांना शिवाजीपार्क येथील स्व.बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करायला लावा असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले.

उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे ती आता समाजाला समजून सांगावी असे आव्हान यावेळी आमदार राणे यांनी दिले.कालचे चित्र बघून मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिग्यांनी दिवाळी साजरी केली.

परत चुकून मुंबईत सत्ता उद्धव ठाकरेंकडे आली तर मुंबईत हिंदू कमी होऊन बांगलादेशी रोहिंगे चे शहर होईल हे चित्र काल दिसले

काँग्रेस वाल्यांपेक्षा संजय राऊत, उद्धव ठाकरे, पेंग्विन, राहुल गांधी आणि सोनिया गांधींचे गुणगान गातायेत. वीर सावरकरांचा नेहमी अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडिला मांडी लावून बसण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केले.उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा समोर आला पाहिजे.संजय राऊतच राहुल गांधी बरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करेल. संजय राऊत देशी ब्रँड, 100 कोटी सोडा 100 रुपये पण या दोघा भावांना कोण देणार नाही. इंडिया आघाडीने हुकूमाचा एक्का बाहेर काढवाच आम्ही वाट बघतोय असे आव्हान दिले. काँग्रेसला आज कुबड्यांशिवाय उभं राहता येत नाही हेच 60 वर्षात काँग्रेसने कमावलं.ओवेसी हा पाकिस्तानचा एजंट आहे.कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.