वेंगुर्ले : प्रतिनिधी : आगामी होणाऱ्या सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले तालुका भाजपा कार्यालयात भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी व अन्य पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यात येणार असून प्रत्येक तालुकानिहाय दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व मुंबई विद्यापीठाच्या सिनेट मेंबरपदी निवड झाल्याबद्दल लखमराजे भोसलेयांचा यांचा वेंगुर्ले भाजपच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेलि भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, कोकण संघटन प्रमुख शिवाजी भावसार,वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत् तांडेल व साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस बाबलि वायगणकर, माजी सभापती सारिका काळसेकर , सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष पप्पू परब, तालुका खरेदी – विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायगणकर, प्रशांत खानोलकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे दिवाकर कुळे, गजानन कुबल, अमित धुरी, संदीप पाटील, शरद मेस्त्री, विजय रेडकर, विलास साळगावकर, महिला तालुका सरचिटणीस वृंदा गवंडळकर , वृंदा मोर्डेकर, रसिका मठकर, सुनील मठकर शहर सदस्य कौस्तुभ वायगनकर, बूथ अध्यक्ष हेमंत तुळसकर , गौरेश खानोलकर , वैभव होडावडेकर, अजित कनयालकर, अनिकेत कुंडगीर , विनीत परब , प्रीतम सावंत, शेखर काणेकर आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आगामी सिनेट निवडणूक भारतीय जनता पार्टी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संयुक्तरीत्या निवडणूक लढविणार येणार आहे. आगामी सिनेट निवडणूक ही कोकणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असे असून त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांनी यावेळी केले.








