शालेय विभागीय जलतरण स्पर्धेसाठी पार्थ परब ची निवड

वेंगुर्ले : प्रतिनिधी : क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय 17 वर्षाआतील जलतरण व डायव्हिंग या स्पर्धेत प्रिं. एम. आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूल, वेंगुर्लेचा पार्थ प्रविण परब (इ.9वी ) याने यश संपादन केले.
क्रिडा संकुल ओरेास येथे घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत 200 मी. फ्रि स्टाईल मध्ये प्रथम क्रमांक, 100 मी. बटरफ्लाय मध्ये प्रथम क्रमांक, 50 मी. फ्रि स्टाईल या प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त करत यश संपादन केले. त्याची शालेय विभागीय स्तरावर होणाऱ्या जलतरण स्पर्धसाठी निवड झाली.
त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रॅान कौन्सिल मेंबर श्री. दौलतराव देसाई, चेअरमन डॉ. सौ. मंजिरी देसाई-मोरे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मिताली होडावडेकर व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.