खेड एसटी स्टँड वर २ कुलर चे लोकार्पण 

प्रवाशांना मिळणार स्वच्छ आणि थंड पाणी

खेड(प्रतिनिधी) खेड एसटी स्टँड वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता स्वच्छ व थंडगार पाणी मिळणार असून सामाजिक कार्यकर्ते खालिद भाई चौगुले यांच्या माध्यमातून स्वर्गीय याकूब गुलाम मोहिदीन हमदुले (शिरशी,खेड) व स्वर्गीय फातिमा मोहम्मद जाफर जस्नाईक (भोस्ते,खेड) यांच्या स्मरणार्थ भेट स्वरूपात दोन कुलर बसवून त्याचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले

येथील बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत होती. सदर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रत्येक प्रवाशाला पाणी विकत घ्यावे लागत होते आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या प्रत्येक प्रवासाच्या खिशाला कात्री बसत होती. त्यातच काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणपती उत्सव, या उत्सवानिमित्त शहरातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावी येत असतो, तेव्हा सगळ्यांना पाणी मिळावं यासाठी एसटी प्रशासन प्रयत्न करत असताना त्यांना यश मिळत नव्हते,

अखेर एसटी स्टँडचे आगार व्यवस्थापक श्री नंदकुमार जाधव यांच्या माध्यमातून खेड तालुक्याचे सुपुत्र आणि विख्यात सामाजिक कार्यकर्ते श्री. खालिदभाई चौगुले, गाव बहिरवली यांना या विषयाची माहिती दिली असताना श्री. खालिद भाई चौगुले यांनी कोणताही विचार न करता हा विषय निकालात काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

एसटी स्टँड वर दोन पिण्याच्या पाण्याचे कुलर बसवण्यात आले असून आहेत त्यांचं लोकार्पण ज्या दोन दानशूर व्यक्तीने ते दिले त्यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांनी दिली.