राजापूर l प्रतिनिधी : राजापूर उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी राजापूर कार्यालयांतर्गत गाव पोलीस पाटील पदभरतीसाठी दिनांक 07/09/2023 रोजी पासुन ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. जाहिरातीत नमुद केल्यानुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क भरण्याकामी दिनांक 20/09/2023 रोजी 23.59 वा पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.
तथापि ऑनलाईन अर्ज करण्याकामी व ऑनलाईन शुल्क जमा करण्याकामी दिनांक 25/09/2023 रोजी 23.59 वा पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
यापुर्वी दिनांक 07/09/2023 ते 20/09/2023 पर्यंत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच पात्र उमेदवाराची यादी दिनांक 29/09/2029 रोजी http://rajapur.ppbharti.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल याची नेंद घ्यावी असे आवाहन राजापूर उपविभागिय अधिकारी यांनी केले आहे.











