मुग्धा भट सामंत यांच्या गायन मैफिलीने रसिक भारावले

मध्यप्रदेशातील सागर येथे रंगली मैफल

माखजन|वार्ताहर :    मध्यप्रदेश मधील मराठी साहित्य अकादमी मध्यप्रदेश संस्कृती परिषद भोपाळ ने आयोजित केलेल्या ‘तुका म्हणे’या गायन मैफिलीत रत्नागिरीतील प्रख्यात गायिका मुग्धा भट सामंत यांनी गायलेल्या गीतांनी मध्यप्रदेशातील मराठी रसिक भारावले.

मध्यप्रदेश मधील श्री दत्त मंदिर महाराष्ट्र समाज,सागर येथे ही नाट्यगीत,अभंग,भजन आदींचा बहारदार कार्यक्रम झाला.यामध्ये समीर जोशी यांनी सहगायकाची भूमिका वठवली.

मुग्धा भट सामंत यांनी राग दुर्गा आळवत मैफिलीला सुरवात केली.यावेळी तैताल व तराणा पेश करत रसिकांची वाहवा मिळवली.यानंतर त्यांनी जय जय राम कृष्ण हरि,रूप पाहता लोचनि,गोविंद गोविंद,जगी हा खास वेड्यांचा, उगवला चंद्र पुनवेचा,जा जा न वचना,ही गिते सादर करत श्रोतू वर्गाच्या टाळ्या मिळवल्या.जा जा न वचना जा या पदाला वन्स मोअर ची दाद मिळाली.

तसेच सहगायक समीर जोशी यांनी सर्वांगी सुंदरू, राम का गुनगान करिये, जन विजन झाले आम्हा, या नवनवल नायनोत्सवा, मर्म बंधातली ठेव ही, माझे माहेर पंढरी ही गीते सादर केली.त्यांना ही रसिकांनी दाद दिली.

या गायन मैफिलीला,उल्हास दळवी यांनी तबला, सर्वेश तांडेल यांनी पखवाज,उत्कर्ष ठाकूर हार्मोनियम,जयंत माणके यांनी ताल वाद्याची साथ केली.सगळ्या कलाकारांचा मराठी साहित्य अकादमी मध्यप्रदेश संस्कृती परिषद भोपाळ तर्फे सन्मान करण्यात आला.

मैफिली ची सांगता मुग्धा भट सामंत यांनी अचूता अनंता या भैरवीने केला.