साडवली : देवरूख येथे झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सन्मान सोहोळ्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत तालुक्यातील जिल्हा परिषद गटांतील विविध पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपाची ध्येयधोरणे लोककल्याणकारी असून ”राष्ट्रहित सर्वोपरी” हे ब्रीद सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रेरित करते यावर विश्वास ठेवून या सर्वांनी पक्षात प्रवेश केला. यामध्ये कोसुंब गटातील नीलेश डोंगरे, संदीप राणे, संकेत डोंगरे, तेजस डोंगरे, धीरज चव्हाण, सूरज शिगवण, संदीप पड्याल, संतोष पड्याल, श्रीकांत शेलार, संतोष जाधव, दत्ताराम पड्याल, शैलेश पाताडे, सुरेश होरांबे, दाजी होरांबे, जयवंत सनगरे, मिलिंद सनगरे, दिलीप गेल्ये, सागर चव्हाण, सागर बावदाने व ओझरे गटातील अमित रेवाळे, किशोर करंबेळे, सूरज रेवाळे आदी कार्यकर्त्यांनी आपल्या मूळ पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये मोदींच्या विकासयात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.











