रत्नागिरी : तालुक्यातील बसणी विकास कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष जयवंत कदम, संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत बसणी ग्रामपंचायतीच्या सभागृहात उत्साहात झाली. सोसायटीचे सचिव सुधाकर देवस्थळी यांनी सर्वांचे स्वागत केले.
सोसायटीच्या सभासदांची मुले दहावी-बारावी व तत्सम परीक्षा पास झाल्याबद्दल त्यांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तलवारबाजीत विभागीय पातळीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सभेस कर्जदारांनी आपली कर्ज सलग हप्त्यात भरून कर्जमुक्त झालेत त्यापैकी सुरेश बारगोडे यांचा सत्कार करण्यात आला. मोहन जोशी हे दिवंगत झाल्यामुळे गेली १५ ते २० वर्षे सोसायटीचे कर्ज थकित होते; मात्र त्यांची पत्नी मेघा जोशी यांनी सोसायटीचे ९ लाख रुपये परतफेड केली. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीचे कामकाज व कर्जवसुली करणारे देवस्थळी व चेअरमन व संचालक यांनी कर्ज वसुलीसाठी उत्तम योगदान दिल्याबद्दल अध्यक्ष जयवंत कदम यांचा सोसायटीने प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला. सोसायटीचे कामकाज व्यवस्थित होत असल्याने सभासदांना पाच वर्षे लाभांश देण्यात येत आहे. यावर्षी पाच टक्के लाभांश देण्यात आला. १४ नोव्हेंबरला सोसायटी हिरक महोत्सवाकडे वाटचाल करत असून त्यासाठी सभेत हिरक महोत्सव साजरा करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.










