लांजा( प्रतिनिधी) दिवाणी न्यायालय लांजा तर्फे न्यायालय परिसरात न्यायालयीन कर्मचारी आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा हा शासनाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी श्रमदानातून न्यायालयीन परिसराची स्वच्छता करण्यात आली.
शासनाच्या वतीने १ आणि २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवण्यात आला. यानुसार दिवाणी न्यायालय लांजा या ठिकाणी देखील हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दिवाणी न्यायाधीश लांजा, वकील संघ लांजाचे अध्यक्ष सदानंद गांगण, उपाध्यक्ष राहुल देसाई आणि वकील संघ लांजाचे सदस्य तसेच तालुका विधी सेवा समिती लांजाचे कायदासाथी आणि दिवाणी न्यायालय लांजाचे सहाय्यक अधीक्षक व न्यायालयीन कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते.











