भाजपा आक्रमक : ठाकरे गटाच्या पोईप येथील होऊ द्या चर्चा कार्यक्रमात गोंधळ

मोदी.. मोदी.. गगनभेदी घोषणाबाजीने परिसर दणाणला

मालवण | प्रतिनिधी : पोईप येथे ठाकरे गटाच्या वतीने होऊ द्या चर्चा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, अनिल कांदळकर, बाबा परब यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी येत जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो… मोदी.. मोदी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत भाजप पदाधिकारी यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप पदाधिकारी अधिक आक्रमक झाले. ठाकरे गट, आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात भूमिका मांडण्यात आली.