रत्नागिरी : जिल्ह्यातील 14 ग्रा. पं. च्या सार्वत्रिक तर 134 ग्रा. पं. च्या होणार पोटनिवडणुका

grampanchayat
कार्यक्रम जाहीर; 5 नोव्हेंबरला मतदान; 6 नोव्हेंबरला मतमोजणी 

रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित आणि सन 2022 मध्ये चुकीच्या प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात या कालावधीत 14 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यांचे नामनिर्देशन पत्र ‘ऑनलाइन’ पद्धतीने भरायचे आहेत. तर जिल्ह्यातील 134 ग्रामपंचायतीच्या 171 जागांसाठी तर ३ सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होणार असून याचे नामनिर्देशन पत्र ‘पारंपरिक’ पद्धतीने तहसीलदार कार्यालयात जाऊन भरायची आहेत.

जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमामध्ये 6 ऑक्टोबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील

16 ऑक्टोबर सोमवार ते शुक्रवार 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा कालावधी आहे

23 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून प्राप्त नावा निर्देशक पत्रांची छाननी केली जाणार आहेत

25 ऑक्टोबर 2023 दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत आहे 25 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल तर

5 नोव्हेंबर 2023 रविवारी सकाळी साडेसात ते साडेपाच या कालावधीत आवश्यक तिथे मतदान केल्या जाणार आहे

6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी आणि निकाल घोषित केला जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात या कालावधीत 14 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यांचे नामनिर्देशन पत्र ‘ऑनलाइन’ पद्धतीने भरायचे आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील तोंडली, उन्हावरे, वाल्मिकी नगर, दापोली तालुक्यातील डौली, मांदिवली, कवडोली, बांधतिवरे, चिपळूण तालुक्यातील कालुस्ते बुद्रुक, कालुस्ते खुर्द, टेरव, गुहागर तालुक्यातील असगोली, संगमेश्वर तालुक्यातील ओझरे बुद्रुक आणि तळेकांटे तर राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

तर जिल्ह्यातील 134 ग्रामपंचायतीच्या 171 जागांसाठी तर ३ सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होणार असून याचे नामनिर्देशन पत्र ‘पारंपरिक’ पद्धतीने तहसीलदार कार्यालयात जाऊन भरायची आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील
मंडणगड तालुक्यातील दहागाव, कादवण, पणदेरी, मुरादपूर, पाट, बहिरवली, उमरोली या गावांचा समावेश आहे.

दापोली तालुक्यातील पाचवली, ईळणे, करजगाव. माटवण, हर्णे, असोंड, सारंग, शिरसाडी, साकुर्डे आणि आंजर्ले ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

खेड तालुक्यातील बोरघर, धामणंद, हुंबरी, कर्जी, कळंबणी खुर्द, कावळे, साखर, सापिर्ली, शिव बुद्रुक, तळवटपाल, वडगाव बुद्रुक, वावे तर्फ नातू, सवणस, सुकीवली, नांदिवली, सवणस खुर्द, तुंबाड या ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होणार आहे.

चिपळूण तालुक्यातील वाघिवरे, वडेरु, कळवंडे, कोकरे, धोक्रवली, डूगवे, गुळवणे, ढाकमोली, देवखेरकी, डेरवण, हडकणी, नांदगाव बुद्रुक, नांदगाव खुर्द, दुर्गवाडी, फुरुस, मांडकी बुद्रुक, तळसर, आंबतखोल, भिले, कळकवणे, गाणे, दळवटणे, आगवे, वालोपे, कोंढे, या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार आहेत.

गुहागर तालुक्यातील आंबेरे खुर्द, शिवणे, कोळवली, पांगरी तर्फे वेळंब, विसापूर, मळण, सुरळ, पाचेरी आगर, साखरी त्रिशूल, काजुर्ली, भातगाव, कुडली, रानवी, कारूळ आणि वरवेली या ग्रामपंचायती आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील डावखोल, धामापूर तर्फ देवरुख, घोडवली, कासे, काटवली, कोळंबे, कोंडीवरे, मावळंगे, मुरडव, मेढे तर्फ फुणगुस, नारडूवे, पांगरी, पुर्ये तर्फ सावर्डे, रांगव शेनवडे, शिरंबे, ताम्हाणे, वाशीतर्फ देवरुख, फुणगुस, सरंद, किरुडूवे, असुर्डे, कळंबस्ते, वांजोळे

रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, रानपाट, जांभरुण, साखर मोहल्ला, पाली, चाफेरी, गुबंद, कासारवेली, निवळी या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडण निवडणुका होणार आहेत

लांजा तालुक्यातील साटवली, वाघणगाव, कुरुचुंब, इसवली, वाघ्रट, हरदखळे, गोविळ, बेनी खुर्द, कोर्ले, शिरवली, वाकेड, आडवली

राजापूर तालुक्यातील येळवण, वडदहसोळ, गोवळ, मौसम, हसोळ तर्फ सौंदळ, वाल्ये, मंदरूळ, झर्ये, पांगरी खुर्द, खिणगिनी, ओझर, नाणार, कोळवण खडी, दसुर, रायपाटण आणि कुवेशी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.