राजापूर l प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील केळवली येथील श्री देवी महालक्ष्मी मंदीर येथे १५ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . भजन , किर्तन , झाकडी व डबलबारी भजनाचा जंगी सामना अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन महालक्ष्मी सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
रविवार दिनांक १५ / १० / २०२३ रोजी सकाळी श्री देवीची पूजा झाल्यानंतर घटस्थापना करण्यात येइल . त्यानंतर रात्री केळवली कोंडोशी येथील बुवा यशवंत कानडे यांचे भजन , केळवली करमळकरवाडी येथील बुवा आप्पा कळमळकर यांचे भजन तर त्यानंतर केळवळी हर्याणवाडी येथील बुवा विश्वास हर्याण यांच्या भजनाचे आयोजन करण्यात आले आहे .
सोमवार दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी श्री महादेव प्रासादिक भजन मंडळ शिरवली देवगड येथील बुवा सागर मोहीते , नवतरुण विकास मंडळ निखरेवाडी बुवा विठोबा नकाशे व श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ केळवली येथील बुवा गणेश जांभळे यांच्या भजनाचे आयोजन केले आहे . तर मंगळवार दिनांक १७ /१० / २०२३ रोजी केळवली येथील बुवा रविंद्र हर्याण यांचे भजन , श्री देसोबाइ प्रासादिक भजन मंडळ मोरोशी बुवा पर्शुराम कानडे व गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तिथवली बुवा संतोष हर्याण यांच्या भजनाचे आयोजन महालक्ष्मी सेवा मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे .
बुधवार दिनांक १८ / १० / २०२३ रोजी माउली प्रासादिक भजन मंडळ वारगाव सिंधुदुर्ग ( ३५ कुळ ) बुवा दिपक नामये , मोसम सरवणकर वाडी येथील बुवा मनोहर सरवणकर व हसोळ येथील बुवा संजय लाड यांच्या भजनाचे आयोजन कर्क्णयात आले आहे . तर गुरुवार दिनांक १९ / १० / २०२३ रोजी कासार्डे साटम वाडी येथील श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा शांताराम तावडे यांचे भजन , मिळंद येथील मावळती प्रासादिक भजन मंडळाचे बुवा राजेश गुरव यांचे भजन , त्यानंतर केळवली उगवतीवाडी येथील बुवा रविंद्र ठोसर यांच्या सुस्वर भजनाचे आयोजन करण्यात आले आहे .
सुक्रवार दिनांक २०/१०/२०२३ रोजी राजापूर तालुक्यातील वाटुळ येतील ह . भ. प. बाळकृष्ण मुरारी चव्हाण यांचे किर्तन तर त्यानंतर सिंधुदुर्ग शिडवणे येथील बुवा बाबा टक्के यांचे प्रसिध्द दिंडी भजन आयोजित करण्यात आले आहे . शनिवार दिनांक २१/१०/२०२३ रोजी सातवी माळ असल्यामुळे या दिवशी रात्री १० वाजता श्री नवलादेवी नाच मंडळ शेढे येथील तुरेवाले शाहीर विलास बावकर व चौकटवाडी गोवळ येथील शक्तीवाले शाहीर दत्तगुरु आग्रे यांच्या शक्ती तुरा सामन्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . रविवार दिनांक २२/१०/२०२३ रोजी केळवली राजापूर येथील सौ . माधवी सुशांत पवार यांच्या मंगळागौर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे . त्यानंतर सामुहीक गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले असुन रात्री १० वाजता २० – २० दबलबारी भजनाचा जंगी सामना श्री दत्तगुरु एकता सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे . या दबळबारी जंगी सामन्यासाठी श्री ब्रह्मदेव प्रासादिक भजन मंडळ उंडील देवगड येथील बुवा राकेश तानवडे व श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ कुणकवण देवगड येथील बुवा योगेश आडिवरेकर यांच्यात रंगणार आहे .
तर दिनांक २३/१०/२०२३ रोजी श्री महालक्ष्मी सेवा मंडळाची उगवती वाडी येथील बुवा वसंत पवार , मधलीवाडी येथील बुवा मनोहर पवार व मावळतीवाडी येथील बुवा रामकृष्ण ठोसर पवार यांच्या भजनाचे आयोजन करण्यात आले आहे . तर मंगळवार दिनांक २४/१०/२०२३ रोजी सकाळी दसरा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन त्यानंतर नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे . नवरात्रीमधील वरील सर्व कार्यक्रम हे सायंकाळी ७ वाजल्यानंतर रोज सुरु करण्यात येणार आहेत .
या नवरात्तोत्सवाच्या कालावधीत येणार्या सर्व भक्तांसाठी महालक्ष्मी सेवा मंडंळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन या कालावधीत सर्व देवी भक्तानी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सालपाटील २०२३ यांच्या वतीने करण्यात आले आहे .












