दापोली | प्रतिनिधी: -दापोली येथील कुटरेकर विद्यालय पंचनदी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली तालुक्यामधील पंचनदी लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी , सखी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे आणि कुणबी ऋणानुबंध सेवा संस्था दापोली यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. डी जे स्वास्थ्य फाउंडेशनचा ग्रामीण भागातील जनसेवेसाठी प्रयत्न करत असून त्यांच्या अंतर्गत या आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. महानगरांसारखे आधुनिक आरोग्य सुविधा टेली मेडिसिन सेंटर द्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कर्करोग, दमा, मधुमेह, सांधेदुखी, त्वचारोग, छातीतील दुखणे, एचआयव्ही सारख्या विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत स्वरूपात दिला जाणार आहे. महिला आणि मुलींसाठी स्त्रीरोग तज्ञ तसेच फिजिओथेरपिस्ट आणि मानसोपचार तज्ञ यांचा मोफत सल्ला देण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. कर्करोगाच्या रुग्णांसाठी या शिबिरात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आरोग्य शिबिरा दरम्यान लोढा वेंचर फाउंडेशन ललित मोहन, सतीश गिरी यांच्या विशेष सहकार्याने मोफत औषधांची सुविधा पुरविण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर ते शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणी दरम्यान विशेष मार्गदर्शनाकरिता डॉ. श्वेता बंसल टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. इनामदार अर्जुन औरंगाबाद, डॉ. हर्षिता गुप्ता क्लिनिकल डायटीशियन न्यूट्रिशियानिस्ट लखन, डॉ. रवी लांडगे जे जे हॉस्पिटल , डॉ. राकेश मित्तल होमी भा भा कॅन्सर हॉस्पिटल वाराणसी, डॉ. भावना मिश्रा बालरोग तज्ञ, डॉ. भुवनेश चतुर्वेदी ऑर्थोपेडिसट अहमदाबाद, डॉ. रूपाली शर्मा स्त्रीरोग तज्ञ गुरुग्राम, डॉ. सबीन कापसे लीलावती हॉस्पिटल, डॉ. श्रुती अग्रवाल के इ एम हॉस्पिटल, डॉ. लीना सक्सेना दुबई, डॉ चारुलता सांखला हिंदुजा हॉस्पिटल हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहून रुग्णाच्या आजाराबाबत विशेष मार्गदर्शन करण्याची सुविधा देखील या शिबिरा दरम्यान उपलब्ध करण्यात येणार आहे. गरजूंनी 9765022588
9082196758
8275188414
8372573122 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.











