दापोली,रत्नागिरी,माखजन केंद्रावर होणार प्राथमिक फेरी
माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन (सरंद) च्या माखजन इंग्लिश स्कूल येथे असलेल्या,कै.पांडुरंग सीताराम लघाटे संगीत कक्षामार्फत जिल्हा स्तरीय आंतरशालेय सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही जिल्हा स्तरीय स्पर्धा २ गटात होणार आहे. इयत्ता तिसरी ते सहावी असा एक तर सातवी ते दहावी असा दुसरा वयोगट असेल .ह्या स्पर्धेची प्राथमिक फेरी दापोली,रत्नागिरी,आणि माखजन या तीन केंद्रांवर होणार आहे.
२० नोव्हेंबर रोजी रत्नागिरी,लांजा,राजापूर या तीन तालुक्यांसाठी रत्नागिरी येथे तर २२ नोव्हेंबर ला खेड,दापोली,मंडणगड तालुक्यांसाठी दापोली येथे,तर २४ रोजी संगमेश्वर,चिपळूण,गुहागर या तालुक्यांसाठी माखजन येथे प्राथमिक फेऱ्या होणार आहेत.तर २४ डिसेंबर ला उपांत्य फेरी हीनार आहे. तर २५ आणि २६ डिसेंबर रोजी माखजन येथे अंतिम फेरी होणार आहे.अंतिम फेरी चे सादरीकरण हे रंगमंचावरून प्रेक्षकांसमोर होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२३ असणार आहे.यासाठी स्पर्धा प्रमुख विशारद गुरव (९४०५९५३४५२),पराग लघाटे (९४२१९२९०७४) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शिवाय गूगल फॉर्म द्वारे या लिंक वर आपली नाव नोंदणी करता येणार आहे.नाव् नोंदणी नंतर प्राथमिक फेरीचे ठिकाणं सांगितले जाणार आहे. या स्पर्धेत प्राथमिक फेरीत आपल्या आवडीचा अभंग ,भावगीत सादर करुन चालणार आहे.अंतिम फेरी साठी एक भावगीत,एक भक्तीगीत,एक नाट्य गीत सादर करावे लागणार आहे.
जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रात पुढे जायचं आहे.अशा विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी असणार आहे.या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आनंद साठे व मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी केले आहे.











