साटवली येथील गौसेपाक पीर बाबा यांच्या ऊरुसाला भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांची उपस्थिती

 

लांजा (प्रतिनिधी)तालुक्यातील साटवली येथील गौसेपाक पीर बाबा यांच्या उरूस कार्यक्रमाला भाजप नेत्या उल्का विश्वासराव यांनी भेट दिली आणि दर्शन घेतले.
या कार्यक्रमाप्रसंगी गौसेपाक पीरबाबा यांचे चरणी नतमस्तक होत उल्का विश्वासराव यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी साटवली गावातील पटेल इर्शाद बरमारे यांनी उल्विका विश्वासराव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. साटवली मुस्लिम समाजाच्या वतीने देखील उल्का विश्वासराव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, महिला तालुकाध्यक्ष परीणीती सावंत, असेच जितेंद्र चव्हाण, अब्दुल कादिर वणू, अबीद काझी, जहीर कोंडकरी, फैजान वणू, सलम काजी, अकबर रखांगी, अविनाश पावस्कर, शिवाजी पराडकर, मारुती अपकरे ,चिंतामणी सावंत, गजानन पराडकर, परशुराम तरळ, बुवा गोपाळे आदी उपस्थित होते.