चिंदर तलाव सुशोभीकरण व पायाभूत सुविधासाठी 6 कोटी निधी

माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश ; भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : प्रादेशिक पर्यटन विकास कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत चिंदर तलाव सुशोभीकरण करणे व पायाभूत सुविधा विकास करणे अंतर्गत 6 कोटी निधीला माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्या नुसार तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मान्यता दिली होती. प्रशासकीय स्तरावर याबाबत कार्यवाही सुरु झाली आहे. चिंदर ग्रामपंचायतचाही पाठपुरावा सुरु आहे. लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरु होईल. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे गतिमान रित्या कार्यवाहीसाठी प्रयत्नाशील आहेत. अशी माहिती भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

चिंदर तलाव सुशोभीकरण व पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नंतर पर्यटनाच्या माध्यमातून चिंदर गाव ठळकपणे पर्यटनाच्या नकाशावर येणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातूनही गावचा अधिक गतिमान विकास होईल. असा विश्वास धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे.