नेत्रावतीखाली सापडून तरुणाचा मृत्यू

चिपळूण (प्रतिनिधी) : पेढे फरशी येथील रेल्वे ट्रॅकवर एका तरुणाने नेत्रावती एक्सप्रेसखाली आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी शैलेश प्रकाश देवळे (३५, रा. परशुराम दुर्गेवाडी) या तरुणाला सायंकाळी ५.५ वाजता नेत्रावती एक्स्प्रेसची धडक लागल्याने त्याच्या शरिराचे दोन तुकडे झाले.

याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी हवालदार रमेश चव्हाण, महेश चिले व सहकारी दाखल झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. चिपळूण पोलीस ठाण्यात या अपघाताची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.