मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
२६ एप्रिल रोजी आयोजन
रत्नागिरी :
हिंदू समाजाने सर्व प्रकारचे भेदभाव विसरुन हिंदू म्हणून संघटितपणे अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठीच हिंदू धर्म परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी विशाल सकल हिंदू संमेलन आयोजित केले आहे. तरी सर्वांनी पारंपारिक मंगल पोशाखात सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून धर्मकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
▪️छत्रपती शिवाजीनगर वस्ती, रत्नागिरी येथे सकल हिंदू संमेलन रविवार २६ एप्रिल २०२६ रोजी – सायंकाळी ५.००ते ७.००या वेळेत श्री जय हनुमान मंदिर, नगर परिषद वसाहत, चर्मालय, येथे संपन्न होणार असून सकल हिंदू समाजाने या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजिका श्रीमती कामिनी महाडिक , सह संयोजक – श्री ओंकार गर्दे, कोषाध्यक्ष श्री दिपक पटेल व छत्रपती शिवाजी महाराज हिंदू समिती तर्फे केले आहे.
मुख्यवे नगर परिषद वसाहत, स्टेट बँक कॉलनी, आदर्श वसाहत, क्रांतीनगर, कोकण नगर, कीर्तिनगर, पहिली कदम वाडी, राधाकृष्णनगर, स्वरूपानंद नगर, प्रशांत नगर, midc भाग, भक्ती कुंज, साई भूमिनगर, परशुरामनगर,जे. के. फाईल्स साळवी स्टॉप, सिद्धिविनायक नगर, हि 17 नगरातील सर्व हिंदू बांधव माता भगिनी अपेक्षित आहेत.












