वैभववाडी | प्रतिनिधी : कुर्ली येथील जागृत देवस्थान श्री कुर्लादेवी आईचा त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव (टिपर) सोमवार दि. 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थित राहावे. वैभववाडी तालुक्यातील सर्वात मोठा टिपर म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते. मोठ्या संख्येने भाविक, चाकरमानी तसेच माहेरवासीनी या उत्सवाला हजेरी लावत असतात. या उत्सवानिमित्त देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व मानकरी बारा पाच यांच्यावतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 8 वा. ग्रामदेवतांची पूजा, सकाळी 8:30 वा. देवीच्या मूर्तीचा अभिषेक, 11 वा. कुर्ला देवी उत्सव मूर्तीला आभूषण अलंकार चढविणे, 12 वा. गणेश पूजन, 12:30 देवीची महापूजा, दुपारी महाआरती व सामुदायिक गा-हाणी, दुपारी महाप्रसाद, नवसिक व सामुदायिक लोटांगण घालणे, सायंकाळी 6 वा. देवीला बारा पाचांची गा-हाणी करून टवळे ठेवणे, 6:30 वा. मानकरांच्या देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम, 7 वाजता भाविकांच्या देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम, रात्री 8 वाजता नवस फेडण्याचा कार्यक्रम व नजीक नवस देवीला बोलणे, रात्री शिवकला व देवराटीचे दिंडीचे आगमन, रात्री दीपोत्सव, टिप्पर पाजळणे, रात्री पालखी प्रदक्षिणा, सामुदायिक गा-हाणी व काकड आरती आदी विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तरी या उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व मानकरी बारा पाच कुर्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.












