वैभववाडीतील फोटोग्राफर सचिन सावंत ची आत्महत्या 

गळफास घेऊन संपवलं जीवन 

वैभववाडी l प्रतिनिधी :       वैभववाडी बाजारपेठेतील फोटोग्राफर सचिन सावंत वय ४० रा. कुसुर पिंपळवाडी याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सचिनने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारणमात्र समजू शकले नाही.

सचिन सावंत गेली अनेक वर्षं वैभववाडीत फोटो व्यवसाय करत होता. संकल्प फोटो स्टुडिओ तो चालवत होता. रविवारी सकाळी तो घरातून बाहेर पडला. सोनाळी गावातील जंगलात साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा करून चौकशी सुरू आहे. त्याच्या पाश्चात्य आई, पत्नी व दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.