आबलोली | वार्ताहर : तालुक्यातील रानवी गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी मनाली महेंद्र कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडी बद्दल तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री.संदिप कदम यांचेसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मनाली कदम यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
नुकत्याच झालेल्या निवडणूकिमध्ये निवडणूक अधिकारी प्रभू देसाई यांनी निवडणूक घेतली यावेळी मनाली कदम यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली यावेळी माजी सरपंच श्री.विनोद चोगले,माजी उपसरपंच वैष्णवी बारगोडे , सदस्य सुहास चोगले,सदस्या मयूरी चोगले, तलाठी श्री.सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.संदिप कदम,डॉ.ईंजेसर, अजित सिंगोडे, महेंद्र कदम, यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते या सर्वांनी नवनिर्वाचित सरपंच सौ.मनाली कदम यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.












