खेर्डीत प्रशांत दाभोळकर यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड

 

चिपळूण (प्रतिनिधी) : खेर्डी गातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाभोळकर यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. आमदार शेखर निकम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांचे त्यांनी आभार मानले आहेत. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे चिपळूण तालुकाध्यक्ष निलेश कदम, खडपोली ग्रामपंचायत माजी सरपंच शैलेश पवार, तालुका युवक कार्यकर्ते राजू सुतार, नारायण जाधव, रमेश वरेकर, रुपेश इंगवले, सचिन शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सत्यप्रतींसाठी खेर्डी व परिसरातील विद्यार्थी, नागरिकांनी आपल्याशी संवाद साधावा, असे आवाहन प्रशांत दाभोळकर यांनी केले आहे.