चौके बाजारपेठ नजीकची घटना ; चालक वाहकासह प्रवासी किरकोळ जखमी
एसटीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान
चौके – प्रतिनिधी
मालवणवरून कसालच्या दिशेने जाणारी मालवण कणकवली एसटी बस आणि येथीलच डंपर मागे घेताना डंपरच्या मागील उद्याला एसटीची ड्रायव्हर साईडने धडक बसल्याने चौके बाजार पेठे नजीक अपघात घडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मालवण आगारातून दुपारी बारा वाजता सुटलेली मालवण कणकवली एसटी बस (MH14-बीटि -2415) ही चौके बस स्टॉप येथील प्रवासी घेऊन काही अंतरावर गेली असता येथील एक डंपरर चालक नेहमीप्रमाणे डंपर (MH07-F 5301) हा मागे घेत असताना एसटी बस चालकच्या बाजूने डंपर ला जोरदार धडक बसली.
यात चालक बालबल बचावला मात्र धडक येवढी जोरदार होती कि बसमधील वाहक आणि पुढे बसलेले प्रवासी यांना किरकोळ दुखापत झाली. ग्रामस्थानी धाव घेत जखमीना ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी काही वेळ वाहतूक खोलंबली होती. वाहकाने उपघाताची खबर मालवण आगारात दिली. एसटी प्रशासनाकडून अपघात स्थळाच्या ठिकाणी माहिती घेत पंचनामा करण्यात आला.उपघतात एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.











