रत्नागिरी : मौजे पिंपळी, ता. चिपळूण येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक येथील योग्यता प्रमाणपत्र
नुतनीकरणाचे कामकाज माहे डिसेंबर 2023 पासून आठवड्याच्या दर बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन
दिवशी करण्यात येईल, याची जिल्ह्यातील वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
जयंत चव्हाण यांनी कळविले आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मौजे पिंपळी, ता. चिपळूण येथील ब्रेक टेस्ट
ट्रॅक येथे चिपळूण, खेड, दापोली व मंडणगड या तालुक्यातील वाहनधारकांच्या सोयीसाठी योग्यता प्रमाणपत्र
नुतनीकरण कामकाज हे आठवड्याच्या दर गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवशी होत असे. आत हे कामकाज
माहे डिसेंबर 2023 पासून आठवड्याच्या दर बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तीन दिवशी करण्यात येईल.










