माखजन हायस्कूल ला सर्वोत्तम शाळा म्हणून पुरस्कार प्रदान

मुंबई येथे एम.एम.आर.डी.ए च्या मैदानावर झाला शानदार सोहळा

माखजन |वार्ताहर :      संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल ला संगमेश्वर तालुक्यातील सर्वोत्तम शाळा म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील एम

एम.आर.डी. ए च्या मैदानावर झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व इ.एस्.इफ.इ च्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला गेला. प्रशालेकडून हा पुरस्कार घेण्यासाठी मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,सहाय्यक शिक्षक ओंकार नामजोशी,सचिन साठे,संस्था संचालक श्री जयंत मालशे उपस्थित् होते.

शाळेच्या भौतिक सोयी सुविधा,वाढता गुणवत्ता आलेख,खेळा मधील नैपुण्य,संगीत विभाग,क्रीडा विभाग,समृद्ध ग्रंथालय,प्रशस्त क्रिडांगण,एकूणच साऱ्या सुविधा पाहून महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार देण्यात आला.पुरस्कार प्राप्त झाल्याने परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शाळेला पुरस्कार मिळाल्याने संस्था अध्यक्ष आनंद साठे यांनी शाळा कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.