शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन संपन्न

मंडणगड l प्रतिनिधी :मंडणगड ता.विकास मंडळ F-1428 मुंबई संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर हाय.व कनिष्ठ महाविद्यालय,मंडणगड येथे हे प्रदर्शन दि.1 डिसेंबर रोजी पार पडले.

या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेच्या संचालक सदस्या सौ.अस्मिता केंद्रे आणि संचालक सदस्य श्री संतोष मांढरेश्री.राकेश शिंदे यांनी केले.

विज्ञान प्रदर्शन मांडलेल्या विविध खोल्यांची नावे डॉ.अब्दुल कलाम,सी.व्ही.रमण आदी भारतीय शास्त्रज्ञांच्या नावे दिल्या गेल्या होत्या.

प्राथमिक आणि माध्यमिक गटामध्ये हे प्रदर्शन भरवले गेले होते.या खोल्यांमधील प्रदर्शनाचे उद्घाटन अनुक्रमे सौ.अस्मिता केंद्रे,श्री.संतोष मांढरे,श्री.राकेश शिंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.खाडे सर, उपप्राचार्य श्री हुल्लोळी सर आणि पर्येवेक्षक श्री बैकर सर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी विज्ञान विभाग प्रमुख श्री.याचावाड सर,शिक्षक प्रतिनिधी श्री बिराजदार सर,सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.

प्रदर्शनात विज्ञान व गणित या विषयातील विविध प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या.भावी शास्त्रज्ञांना आलेल्या पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या.

दुपारच्या सत्रात या सर्व प्रतिकृतीचे परीक्षण करण्यात आले.

प्राथमिक गटासाठी भालके सर,वाघमारे मॅडम,गिरी सर;माध्यमिक गटासाठी बिराजदार सर,राणे मॅडम आणि पिंगळा सर यांनी परीक्षणाचे काम पाहिले.

प्रत्येक गटात प्रथम,द्वितिय,तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले.

माध्यमिक गटामध्ये *अपघात नियंत्रण हेल्मेट* विद्यार्थी-रूतुराज हरिजन,सुमेश सकपाळ

प्राथमिक गटामध्ये

*वाॅटर अलार्म*

विद्यार्थिनी-कु.स्नेहा कुंभार,कु.सई करावडे

या प्रतिकृतींना प्रथम क्रमांक मिळाला आहे.या प्रतिकृती सोवेली ता.मंडणगड येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरल्या आहेत.