शून्यातून विश्व निर्माण करण्याचे काम सुरेशशेठ चिपळूणकर यांनी केलेय!

माजी आमदार रमेश कदम यांचे प्रतिपादन

माजी नगरसेवक व ठेकेदार सुरेशशेठ चिपळूणकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

चिपळूण (प्रतिनिधी):-सामाजिक, ठेकेदारी, राजकीय क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करण्याचे काम नामवंत ठेकेदार माजी नगरसेवक सुरेशशेठ चिपळूणकर यांनी केले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेशभाई कदम यांनी सुरेशशेठ चिपळूणकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी कौतुक केले.

सुरुवातीला सुरेशशेठ चिपळूणकर यांच्या सुविद्य पत्नी व माजी नगरसेविका सौ. सरिता चिपळूणकर यांच्यासह कुटुंबीयतील भगिनींनी त्यांचे औक्षण केले. नंतर समाज बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ) अजित पवार गट ) पक्षाचे चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, रोहिदास समाजसेवा संघ चिपळूणचे सरचिटणीस प्रकाश पेढांबकर यांनी आपल्या मनोगतात नामवंत ठेकेदार व माजी नगरसेवक सुरेशशेठ चिपळूणकर यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक, राजकीय व ठेकेदारी क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेतला.

तर उत्सवमूर्ती, माजी नगरसेवक सुरेशशेठ चिपळूणकर यांनी आपल्या मनोगतात आपला जन्म गरीब कुटुंबात झाला म्हणून या वेदनेत न राहता आपण सातत्यपूर्ण काम करीत राहिलो. सामाजिक, राजकीय, ठेकेदारी क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करीत आलो आहोत. आपल्या या संपूर्ण वाटचालीत कुटुंबीयांची समर्थ साथ लाभली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. रोहिदास समाज बांधव तसेच ठेकेदारांनी आपल्यावर अध्यक्ष पदाची धुरा सोपवून विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी आपले प्रयत्न राहिले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेशभाई कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे अशी ग्वाही यावेळी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, माजी नगरसेवक अविनाश केळस्कर, राजेश कदम, रमेश खळे, दिनेश शिंदे, वासुदेव मेस्त्री, संजय चिपळूणकर, रोहिदास समाजसेवा संघ चिपळूणचे उपाध्यक्ष मंगेश पेढांबकर, अनिल चिपळूणकर, कोषाध्यक्ष सुनील चिपळूणकर, सरचिटणीस प्रकाश पेढांबकर, सरचिटणीस संदीप मुंढेकर, सदस्य संतोष रीळकर, अंकुश चिपळूणकर, संदीप चिपळूणक, अजित आंबवकर, प्रकाश सावर्डेकर, यशवंत पेढांबकर, सौ. रसिका सावर्डेकर, अजय कदम, नितीन कमलाकर, दीपक अंबावकर, समीर जानवलकर, समन्वयक विष्णुपंत सावर्डेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, सदस्य रियाज खेरटकर, ठेकेदार संघटनेचे गणेश कांबळे, तौसिफ खलपे, राजू खेडकर, रोहित कांबळे आदींनी उपस्थिती दर्शवित सुरेशशेठ चिपळूणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पेढांबकर यांनी केले.