भांडुप येथील मासिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा
मुंबई : आरमारी गाबीत समाज संस्था ( रजि) यांची कार्यकारिणीची मासिक सर्वसाधारण सभा भांडुप येथे संपन्न झाली.यावेळी आरमारी गाबीत समाज संस्था तर्फे दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन मंडळाचे अध्यक्ष व समस्त कार्यकारिणी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळि अध्यक्ष अविनाश कुबल, उपाध्यक्ष सूर्यकांत खवळे, उपाध्यक्ष डॉ .गणेश बांदकर, सचिव सतिश धुरत, सहसचिव रविंद्र कोयंडे, खजिनदार नाना मोंडकर, कार्यकारिणी सदस्य सुनील जोशी, महेश जुवाटकर, शरद कोयंडे, गणेश फडके व हरिश्चंद्र मोंडकर उपस्थित होते.












