सिंधुदुर्गचे सह दिवाणी न्यायाधीश संतोष चव्हाण यांचे आकस्मिक निधन

सिंधूनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्गचे सह दिवाणी न्यायाधीश संतोष चव्हाण वय 50 यांचे आज पहाटे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे जिल्हा न्यायालयात शोककळा पसरली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील असून सह दिवाणी न्यायाधीश म्हणून ते या जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे.

पणदूर शांतीनगर येथे ते कुटुंबासमवेत राहत होते. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येते. सकाळी पत्नी त्यांना उठवण्यास गेली असता उठलेच नाहीत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पूर्वीच त्यांची प्रांजल मालवली होती. पाच महिन्यापूर्वी त्यांनी पाटील सह दिवाणी न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता.